18 ते 23 दरम्यान विविध तालुक्यांमध्ये नाट्याप्रयोग
वार्ताहर/ मडकई
शासकीय पातळीवरील राज्यस्तरीय शिवजयंती उत्सव रविवार 19 फेब्रुवारी रोजी फर्मागुडी येथे साजरा करण्यात येणार आहे. माहिती व प्रसिद्धी खाते, बांदोडा ग्रामपंचायत व कवळे जिल्हा पंचायतीच्या संयुक्त सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.45 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते फर्मागुडी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वाऊढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण कऊन कार्यक्रमाला सुऊवात होणार आहे.
यावेळी कृषिमंत्री रवी नाईक, जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, फोंडा नगराध्यक्ष रितेश रवी नाईक, बांदोडा सरपंच सुखानंद गावडे, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, माहिती व प्रसिध्दी खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर, प्रमुख वक्ते इतिहासकार तथा स्वातंत्र्यसैनिक डॉ. अमर अडके आदी मान्यवर उपस्थित असतील. सकाळी 8.30 वा. मडकई येथील जगदंब ढोल ताशा पथकातर्फे सादरीकरण व बालभवनच्या विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा सादर करण्यात येतील. त्यानंतर 8.45 वा. मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्याहस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल.
माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांनी फर्मागुडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवजयंती कार्यक्रम जाहीर केला. बांदोडाचे सरपंच सुखानंद गावडे, शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य पत्रकार जगन्नाथ मुळवी, पत्रकार नरेंद्र तारी, माहितीअधिकारी ऑल्वीन पेरेरा परेरा हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर इतिहासकार डॉ. अमर अडके यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्यान होणार आहे. मुख्य कार्यक्रमानंतर शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी नाट्याप्रवेश स्पर्धा घेण्यात येईल.
राज्यस्तरीय शिवजयंती उत्सवानिमित्त 18 ते 23 दरम्यात राज्यातील विविध तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित नाट्याप्रयोग सादर करण्यात येतील. 18 रोजी सायं. 7.30 वा. फोंडा येथील जुन्या बसस्थानकावर पुण्याई रंगधारा मडकई निर्मित ‘करीन ती पूर्व’, त्याच दिवशी सायंकाळी दाभाळ येथील सोमनाथ बलभीम देवस्थानच्या रंगमंचावर सुयोग कला मंच करमळी, तिसवाडी निर्मित ‘शिव आलिंगन’, दुकरकोंड काले येथे नाट्यातरंग पेडे, म्हापसा निर्मित ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाट्याप्रयोग होणार आहेत.
19 रोजी सायं. 7.30 वा. गोपाळ गणपती देवस्थान फर्मागुडी येथे ओम कलासृष्टी नागेशी बांदोडातर्फे ‘श्रीमान योगी’, पर्वरी येथे नाट्यासंपदा नागझर पेडणे निर्मित ‘आकाश मिठी’ हे नाट्याप्रयोग होतील.
20 रोजी सायं. 7.30 वा. सांखळी येथील रवींद्र भवनमध्ये श्री महालक्ष्मी युवक तळावली निर्मित ‘स्वराज्य धर्म’, दोनमाड केरी सत्तरी येथे नाट्यासंपदा नागझर पेडणे निर्मित ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाट्याप्रयोग सादर होतील.
21 रोजी सायं. 7.30 वा. हेडलँड सडा मुरगाव येथे श्री महालक्ष्मी युवक संघ तळावली निर्मित ‘स्वराज्य धर्म’, कुंडई येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात ओम कलासृष्टी नागेशी बांदोडा निर्मित ‘श्रीमान योगी’, साकोर्डा येथील हिराबाई तळावलीकर हायस्कूलच्या रंगमंचावर पुण्याई रंगधारा मडकई निर्मित ‘करीन ती पूर्व’ हे नाट्याप्रयोग होईल.
22 रोजी सायं. 7.30 वा. रवींद्र भवन कुडचडे येथे श्री महालक्ष्मी युवक संघ तळावली निर्मित ‘स्वराज्य धर्म’, बाजार शिरोडा येथे ओम कलासृष्टी नागेशी बांदोडा निर्मित ‘श्रीमान योगी’ हे नाट्याप्रयोग सादर होतील.
23 रोजी सायं. 7.30 वा. गोपाळकृष्ण गजानन देवस्थान कासवाडा, तळावली येथे श्रींची इच्छा थिएटर हरमल पेडणे निर्मित ‘गरुड झेप’ हा नाट्याप्रयोग होणार आहे. शिवप्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.