Invitation to Poet Kamlesh Gosavi from Secretariat of Atomic Energy
मुंबईत होणार कार्यक्रम
27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक साहित्यिक कार्यक्रम होत असतात. याच अनुषंगाने भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग सचिवालय मुंबई येथे मराठी भाषा दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि प्रसिद्ध कवी, लेखक कमलेश गोसावी यांना प्रमुख कवी म्हणून निमंत्रण प्राप्त झाले आहे. मागील वर्षी या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर हे प्रमुख कवी म्हणून उपस्थित होते.
कमलेश गोसावी हे माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत. 2019 पणजी येथे झालेल्या शिक्षक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर नोव्हेंबर 2022 नेपाळमध्ये झालेल्या भारत नेपाळ हिंदी साहित्यिक संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
कमलेश गोसावी यांचे कवितांचे कार्यक्रम अनेक शाळा महाविद्यालयात संपूर्ण राज्यभर होत असतात. भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या प्रमुख कवी म्हणून निमंत्रणाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कणकवली / प्रतिनिधी