पेडणे पालिकेच्या बैठकीत आमदार आर्लेकर यांची सूचना, विविध विषयांवर चर्चा
पेडणे / प्रतिनिधी
विकासकामे योग्य पद्धतीने होतात की नाही याची माहिती मिळण्यासाठी पेडणे पालिकेच्या दोन अभियंत्यांनी पालिकेच्या विकास कामांवर लक्ष देऊन त्या कामाचा अहवाल आपल्याला दर 15 दिवसांनी सादर करावा, अशी सूचना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी काल पालिकेच्या बैठकीत केली. पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा बैठकीत करण्यात आली. नगराध्यक्ष माधव सीनाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी बैठकीला नियुक्त प्रतिनिधी म्हणून पेडणे मतदारसंघाचे नियुक्त सदस्य म्हणून आमदार प्रवीण आर्लेकर उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, पालिका मुख्याधिकारी अनिल राणे सरदेसाई, नगरसेवक विष्णू साळगावकर, नगरसेवक मनोज हरमलकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, नगरृसेविका उषा नागवेकर, नगरसेविका राखी कशालकर, नगरसेविका आश्विनी पालयेकर, नगसेविका विशाखा गडेकर तसेच अभियंते थॉमस ब्रागांझा आदी उपस्थित होते. पेडणे पालिकेच्या नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे काम कशा पद्धतीने चालले याचीही पाहणी करावी तसेच हे काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही हेही पाहावे तसेच पालिकेचा महसूल वाढविण्यासाठी थकित करांची वसुली करावी. यासाठी पालिका मंडळ आणि अधिकाऱ्यांनी योग्य ती पाऊले उचलून काम करावे अशी सूचना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली.
पेडणे पालिका क्षेत्रातील विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे नियुक्त अभियंते चंद्रकांत पर्येकर तसेच पालिकेचे अभियंते थॉमस ब्रागांझा का उपस्थित राहत नाही याबाबत प्रश्न बैठकीत केला. पुढील वेळी आपल्याला दोन्ही अभियंते उपस्थित असलेले पाहिजे. दर पंधरा दिवसातून प्रत्येक विकास कामाचा अहवाल आपल्याला सादर करण्याचे सूचना यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली.
पालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले तसेच एन.ओसी आणि अन्य सुविधा प्रमाणपत्र देण्यासाठी पालिकेचे कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याची तक्रारी आल्या असून असे प्रकार घडू नये, लोकांची कामे अडवून ठेवू नये अशा सूचना करून त्यांना सहकार्य करावे असे आर्लेकर यांनी सांगितले. पालिका क्षेत्रात पावसासाठी गटार व्यवस्था तसेच रस्त्याच्या बाजूची झाडे कापण्यासाठी मिळत असलेला निधी एकदम कमी असल्याचे नगराध्यक्षांनी बैठकीत सांगितले. यंदा निधी ज्यादा मागून घेण्यासाठी पत्रव्यहार करावा, जेणेकरून दहाही प्रभागात तो समान वाटप होईल अशी यावेळी विष्णू साळगावकर यांनी सांगितले. पालिका गाडेधारकांना जुन्या पद्धतीने कर भरावा लागणार असल्याची चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्ष माधव सीनाई देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा कर हा प्रति चौरस मीटर तीनशे तीन ऊपये असल्याचे यावेळी सांगितले. विविध विषयावर झालेल्या चर्चेत विष्णू साळगावकर माधव देसाई, मनोज हरमलकर, सिद्धेश पेडणेकर, उषा नागवेकर यांनी भाग घेऊन आपल्या विविध सूचना केल्या.
स्थानिकाना आडकाठी आणू नका
यावेळी अनेकांनी आपला लहान मोठा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पेडणे पालिकेकडे अर्ज केले आहेत. मात्र त्यांना अजूनही मान्यता का दिली नाही असा प्रश्न यावेळी विष्णू साळगावकर यांनी केला. लोकांना व्यवसाय करू द्या, त्यांना आठकाठी आणू नका अशी सूचना यावेळी आमदार आर्लेकर यांनी केली.
पेडणे पालिकेचा सोपो कर गोळा करण्यासाठी प्रथम बोली 15 लाख ऊपये करावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासंबंधी योग्य ते सोपस्कार कऊन पावणी पुकारावी असे ठरले. पालिकेकडे सोपो कर गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असून सोपो कराची पावणी पुकारावी असे ठरले. पेडणे पालिकेचा कचरा प्रकल्प माळरानावर असून हा कचरा प्रकल्पाचे पुढची प्रक्रिया काय झाली त्यासाठी पालिका मंडळाने आमादारांसोबत या कचरा प्रकल्पाला भेट देऊन पहाणी बुधवारी करावी असा निर्णय घेण्यात आला. सुऊवातीला नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांनी स्वागत केले. आभार उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई यांनी मानले.