बेळगाव : कॅम्प येथील प्रतिष्ठित नागरिक शांतादेवी बापुसाहेब नेर्ली (वय 86) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मोठ्या बहीण होत. त्यांच्या पश्चात केएलई इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्रातील तज्ञ डॉक्टर आर. बी. नेर्ली, सून सुप्रिया, नात नयना असा परिवार आहे. आपल्या विकासात मोठ्या बहिणीचे मार्गदर्शन मोलाचे आहे. नात्याने मोठी बहीण असली तरी ती आई स्वरूप होती. तिच्या जाण्याने आपल्याला मोठा धक्का बसला आहे, अशा शब्दांत डॉ. प्रभाकर कोरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
Previous Articleतालुक्यातून हजारो कार्यकर्ते ‘चलो मुंबई’ आंदोलनासाठी रवाना
Next Article अखेर रेल्वेस्थानकात शिल्पे बसविली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.