प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील वेगवेगळ्या भागात ताब्यात घेण्यात आलेल्या तब्बल 4 हजारांहून अधिक हिंदू देवदेवतांच्या भग्न प्रतिमा शनिवारी विधीवत दहन करण्यात आल्या. सर्व लोकसेवा फौंडेशनने हा उपक्रम राबविला.
बसव कॉलनी परिसरात शनिवारी सकाळी या सर्व प्रतिमा एकत्रित करून त्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. फौंडेशनचे अध्यक्ष विरेश बसय्या हिरेमठ, उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील, आत्मा मालिकबाबा, बसय्या हिरेमठ, महादेवी हिरेमठ, यल्लोजीराव पाटील, राम निलजकर, मारुती कणबरकर, देवाप्पा कांबळे, विजयकुमार मोरे, गुरुराज वाली, बाळू कणबरकर, लिंगय्या बुर्लकट्टी, आदी पाटील, गजानन पाटील, सुरेश हंचिनमनी, उज्ज्वला गावडे, आनंद भातकांडे आदींच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
शहरातील विविध भागात रस्त्याशेजारी, झाडांखाली, मंदिर परिसरात टाकून देण्यात आलेल्या हिंदु देवदेवतांच्या जीर्ण प्रतिमा जमा करून त्या एकत्रित करण्यात आल्या होत्या. काचा बाजुला काढून केवळ प्रतिमांचे दहन करण्यात आले. त्याची राख पिंपळ, वड, बेलपत्र, तुळशी तसेच इतर वृक्षांना घालण्यात येईल, असे फौंडेशनच्या अध्यक्षांनी सांगितले.