शिलाँग / वृत्तसंस्था
मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी नॅशनल पीपल्स पक्षाचे नेते कोनराड संगमा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना राज्यपाल फागू चौहान यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, इतर मान्यवरांसह उपस्थित होते.
संगमा यांच्यानंतर त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रिस्टन तिनसाँग आणि स्निअभलांग धार यांनीही शपथग्रहण केले. या दोघांनाही उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या गारो, खासी आणि जैनतिया या तिन्ही भागांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळाले आहे. याशिवाय अन्य 9 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांच्यात एनपीपीचे पाच, युनायटेट डेमेक्रटिक पक्षाचे 2 तसेच भाजपचा एक आणि हिल स्टेट पीपल्स डेमॉपेटिक पक्षाचा एक यांचा समावेश आहे. कोनराड संगमा सलग दुसऱयांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 25 जागा मिळाल्या आहेत.
45 जणांचे समर्थन
मेघालयमध्ये यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र, संगमा यांना 45 जणांचे समर्थन प्राप्त आहे. काँगेस वगळात सर्व मुख्य पक्षांनी संगमा यांना समर्थन दिले आहे. काँगेस पक्षाला राज्यात केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. भाजपचा सहभाग मंत्रिमंडळात असण्याची ही दुसरी वेळ आहे.