व्हॉट वुमेन वॉन्टच्या एपिसोडमध्ये दिसणार
करिना कपूर आणि राणी मुखर्जी या दोन्ही दिग्गज अभिनेत्री एका शोसाठी एकत्र आल्या आहेत. करिनाचा टॉक शो व्हॉट वुमेन वॉन्टच्या आगामी एपिसोडमध्ये राणी मुखर्जी दिसून येणार आहे. हा या शोचा चौथा सीझन आहे. राणी मुखर्जीपूर्वी या शोमध्ये रणवीर कपूर दिसून आला होता.
शोच्या एपिसोडकरता दोन्ही अभिनेत्रींनी शनिवारी फोटोसेशन केले आहे. अभिनेत्रींची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहिल्या छायाचित्रात राणी आणि करिनाने परस्परांचा हात पकडल्याचे तर दुसऱया छायाचित्रात क्लॅपबोर्ड पकडल्याचे दिसून येते.
करिना आणि राणी या दोघी बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय चेहऱयांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र देखील काम केले आहे. यात कभी खुशी, कभी गम आणि मुझसे दोस्ती करोगे, तलाश-द-आन्सर लाइज विथइन, एलओसी-कारगिल, युवा आणि अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
राणी मुखर्जी सध्या स्वतःचा आगामी चित्रपट मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वेच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बरने केले आहे. राणीसोबत या चित्रपटात अनिर्बान भट्टाचार्य, जिम सर्भ आणि नीना गुप्ता हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. तर करिना कपूर लवकरच सुजॉय घोषच्या ‘द डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ चित्रपटातून पेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच हंसल मेहतांचा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ आणि रिया कपूरच्या ‘द क्रू’ या चित्रपटात करिना काम करत आहे.