1 एप्रिलला तुरुंगातून मुक्तता शक्य
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांची 1 एप्रिल रोजी तुरुंगातून मुक्तता होऊ शकते. पूर्ण शिक्षेदरम्यान कुठलीच सुटी न घेतल्याचा लाभ सिद्धू यांना मिळू शकतो. यापूर्वी 26 जानेवारी रोजी त्यांची सुटका होणार असल्याचे मानले जात होते, परंतु मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावात त्यांचे नाव नसल्याने ही सुटका झाली नव्हती.
सिद्धू हे 20 मे 2022 रोजी तुरुंगात गेले होते, त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली असली तरीही मुक्ततेसाठी 19 मे 2023 पर्यंतची प्रतीक्षा त्यांना करावी लागणार नाही. पूर्ण वर्षादरम्यान त्यांना कुठलीच सुटी घेतलेली नाही. यामुळे 1 एप्रिल रोजी ते तुरुंगातून बाहेर पडू शकतात. मागील वेळी फजिती झाल्याने काँग्रेस आता सिद्धू यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करणे टाळत आहे.
एनडीपीएस आणि संघीय दंडाच्या व्यतिरिकत एक महिन्यात सोपविण्यात आलेल्या कार्याची प्रगती तसेच कैद्यांच्या वर्तनाच्या आधारावर 4-5 दिवसांची सुटी दिली जाते. याचबरोबर काही शासकीय सुटय़ांच लाभ कैद्यांना मिळतो. तर नवज्योत सिंह सिद्धू यांनी पूर्ण शिक्षेदरम्यान एकदाही सुटी घेतलेली नाही.