Eknath Shinde On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगावच्या पाचोरा येथील सभेत एकेरी उल्लेख केला. यावरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी ठाकरेंच्या वक्तव्याला प्रत्यूत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला आहे, त्यांचा निषेध करावा तितका कमी असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये नेतृत्व सिद्ध केलं आहे.मोदींच्या मातोश्रींचं निधन झालं त्यावेळी त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं, त्यांच्यामुळेच आपली अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर गेली आहे. भारताला जी २० परिषदेचं अध्यक्षपद पंतप्रधानांच्यामुळेच मिळाले आहे. त्य़ांनी कधीही कामात कसूर केली नाही. उद्धव ठाकरे यांनी एकेरी उल्लेख केला आहे, त्यांचा निषेध करावा तितका कमी असल्य़ाचे ते म्हणाले.
उध्दव ठाकरे नेमकं काय म्हणाले,
पाचोऱ्यात गद्दाराला गाडावं लागेल. वैशालीताई तात्यांचं काम घेऊन पुढे जात आहेत. सगळे तिकडे लोभासाठी जात असतांना वैशालीताई तुम्ही लढण्यासाठी इथे आहात. आता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. निवडणूक आली तर वैशालीताईंच्या पाठिशी तुम्हाला उभं राहावं लागेल असे कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी घराणेशाहीचं समर्थन करताना उध्दव ठाकरे म्हणाले की,घराणेशाहीतही घराण्याची परंपरा असते. अरे तुला आगे ना पिछा. तुला कोणी नाही. झोळी घेऊन निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देशील, त्याचं काय करायचं. जनता भिकेला लागेल,त्यांचं काय?’घराण्याची परंपरा असते.पाचोऱ्यात गद्दाराला गाडावं लागेल,’ अशा शब्दांत नाव न घेता उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गद्दाराला गाडावं लागेल.’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता टीका केली.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.