’63व्या महाराष्ट्र दिना’निमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर प्रमुख व्यक्तींसह राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी सोमवारी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
आपल्या ट्विटमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याला एका महान संस्कृतीचा आणि कष्टाळू लोकांचे बरदान लाभले आहे. ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय प्रगती समृद्ध केली आहे. येत्या काळात महाराष्ट्राची प्रगती अशीच होत राहे अशी मी प्रार्थना करतो.” असे ट्विट केले आहे.
देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र ही संत, नायक, कलाकार आणि व्यक्तिमत्त्वांची भूमी आहे. या व्यक्तीमत्वांनी देशाच्या अनेक क्षेत्रात आपल्या प्रतिभेची आणि योगदानाची अमिट छाप सोडली असल्याचे म्हटले आहे. त्याम्हणाल्या “महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सर्व देशवासीयांना विशेषत: महाराष्ट्रातील जनतेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या स्थिर प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा,” असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वांची जन्मभुमी असल्याचेही अध्यक्ष मुर्मू म्हणाल्या.
महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांनी “संयुक्त महाराष्ट्र चळवळी” दरम्यान बलिदान दिलेल्या शहिदांना आदरांजली वाहिली. सोमवारी हुतात्मा स्मारक चौकात महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिलेल्यांच्या स्मारकांवर पुष्पचक्र अर्पण केले आहे.