कणगलेनजीक घटना : सुमारे 2 कोटींचे नुकसान : चालक जखमी
वार्ताहर /कणगले
हुंदाई शोऊमकडे कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास सागर धाब्यानजीक घडली. या घटनेत दोन्ही वाहनांचे सुमारे 2 कोटींचे नुकसान झाले आहे. तर चालक साजीद (रा. हरियाणा) हा जखमी झाला आहे. त्याला बेळगाव येथील ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी, बेंगळूर येथील हुंदाई कंपनीतून पुणे येथील शोऊममध्ये कार वाहतूक करणारे दोन कंटेनर येथील सागर धाब्यानजीक थांबले होते. अचानक दोन्ही कंटेनरच्या एअर पाईपमध्ये बिघाड झाला. त्यामुळे आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्रऊप धारण केले. त्यात वाहनाची डिझेलची टाकी फुटल्याने आगीची तीव्रता वाढली. त्यात कंटेनरमधील कारचे टायर फुटल्याने आगीचा भडका वाढला. त्यात दोन कंटेनरसह 16 कारचे एकूण सुमारे 2 कोटांचे नुकसान झाले. सदर दोन कंटेनरमध्ये वेरणा, औरात, आयटेल व क्रिस्टा या कंपनीच्या कार होत्या. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर व निपाणी येथील तीन अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवला होता. तब्बल 3 तासांनी आग विझवण्यात जवानांना यश आले. घटनास्थळी जिल्हा अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी शशिकांत निलगार यांनी भेट देऊन पाहणी केली. आग शॉर्टसर्किटने लागली की, अन्य कोणत्या कारणाने लागली याचा तपास केला जात आहे. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली आहे. सदर घटनेमुळे खबरदारी म्हणून मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर थांबविण्यात आली होती.