राजबाग-तारीर येथे कार्यक्रम, केंद्रीय मत्स्योद्योग राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची उपस्थिती, विविध योजनांच्या लाभाचे व कार्डांचे वाटप
काणकोण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सागरमाला परिक्रमा, 2023 च्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप कार्यक्रम 19 रोजी काणकोण मतदारसंघातील राजबाग, तारीर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात झाला. केंद्रीय तसेच राज्याच्या मत्स्योद्योग खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मत्स्योद्योग तसेच पशुसंवर्धन राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभाला सभापती रमेश तवडकर, गोव्याचे मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, मत्स्योद्योग खात्याचे केंद्रीय सचिव जे. एन स्वान, डॉ. जे. बालाजी, डीआयजी अनुराग घोष, एल. एम. मूर्ती, राज्यातील मत्स्योद्योग संचालिका शर्मिला मोंतेरो, क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष अशोक धुरी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा यावेळी मंत्री रुपाला यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री योजनेखाली राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाचे आणि मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या कार्डांचे वितरण करण्यात आले. तसेच मत्स्योद्योगाबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
17 मत्स्य व्यावसायिकांना अर्थसाहाय्य
काणकोण, मुरगाव, तिसवाडी तसेच सासष्टी तालुक्यातील 17 मत्स्य व्यावसायिकांना यावेळी 22 लाख 27 हजारांचे अर्थसाहाय्य बोट दुरुस्ती व मासेमारीची जाळी खरेदी करण्यासाठी देण्यात आले. त्यात शेख अब्दुल हमीद, तुकाराम चांदेकर, कॉस्तांसियो बार्रेटो, बाबू तांडेल, जुझे ब्रागांझा, फ्रान्सिस ब्रागांझा, कॅजिटन मुरजाव-मुरगाव, सदानंद चंद्रू पागी, रामनाथ पिलू पागी, संतोष हरिश्चंद्र ठक्कर, प्रताप चंद्रकांत काणकोणकर, मेहक मुकुंद पागी, उज्ज्वला शंकर पागी-काणकोण, अविनाश काब्राल, सुकूर ब्रागांझा, मिलाग्रीस फर्नांडिस-तिसवाडी यांचा समावेश होता.
इन्सुल्ड वाहन खरेदी करण्यासाठी रोहिनाझ अजिझजी, रेमेडिओ डिमेलो आणि हेन्रिक डिमेलो यांना 4 लाख 57 हजार रुपयांचे धनादेश, इन्सुल्ड पेट्या खरेदीसाठी गुरुदास धुरी, सुशांत पागी, संतोष विठ्ठल पागी, उर्मिला उल्हास पागी, मधुकर कांता पागी व सुधाकर पागी यांना 22 हजार 958 रुपयांचे धनादेश, तर सुरक्षेची साधने खरेदी करण्यासाठी फ्रान्सिस रॉड्रिग्स, इरफान पोटकर, जुआंव गोयस, कायतान फर्नांडिस, सॅनफोर्ड रॉड्रिग्स, मायकेल फर्नांडिस, कायतान रॉड्रिग्स व मिनीन आफोंसो यांना 5 लाख 6 हजार 150 रुपयांचे धनादेश केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
48 जणांना मासेविक्रेता कार्डे
या समारंभात प्रतिमा हरिश्चंद्र पागी, बेबी रत्नाकर पागी, वत्सला पांडू पागी, कविता कांता पागी, सुमित्रा पागी, शोभा पागी, मायावती दत्तू पागी, प्रियांका प्रदीप पागी, अमिता अमृत पागी, सत्यवती राघोबा पागी, उज्ज्वला श्रीकांत पागी, दीपा दिलीप पागी, श्रीमंती रत्नाकर पागी, तेजा तैकुश पागी, दीक्षा पागी, प्रशांती जयेश पागी, शिल्पा सतीश पागी, चंद्रकला सी. पागी, अंकिता गुरुदास पागी, लतिका लक्ष्मण पागी, सुरेखा राम पागी, राजश्री घनश्याम पागी, सुषमा प्रदीप पागी, दीपा पागी, अश्विनी अशोक पागी व भगिरथी भारत पागी या महिला विक्रेत्यांना मासळी विव्रेता कार्डे प्रदान करण्यात आली.
संजीवनी संगीत अकादमीच्या पथकाने सुरुवातीला स्वागतगीत, तर पैंगीणच्या श्री बेताळ सांस्कृतिक पथकाने लोकनृत्य प्रकार सादर केले. मंत्री हळर्णकर यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना सभापती तवडकर यांनी गोव्यातील मच्छीमार बांधवांच्या समस्या समजून घेणारे रुपाला हे तत्पर मंत्री असल्याचे सांगितले. केंद्र सरकारकडे मत्स्य व्यावसायिकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री रुपाला यांनी गोवा विधानसभेच्या सभापतींच्या मतदारसंघात सागरमाला परिक्रमेचा समारोपाचा कार्यक्रम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या खात्याकडे अनेक योजना आहेत. मात्र त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. दूध, मासे आणि शेती ही लोकांच्या जीवनाची प्रमुख साधने असून पशुपालनाला उत्तेजन देण्याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष अशोक धुरी, क्षत्रिय पागी पारंपरिक मच्छीमार संघटनेचे प्रमोद जुवेकर यांनी मंत्र्यांना मच्छीमारांच्या समस्यांसंदर्भात निवेदन सादर केले. सूत्रसंचालन सुभाष जाण यांनी केले, तर रुद्रेश नमशीकर यांनी आभार मानले. काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, मत्स्योद्योग खात्याचे अधिकारी, काणकोण पालिकेचे नगरसेवक, भाजपाच्या मंडळ समितीचे पदाधिकारी हेही उपस्थित होते.