जिल्हय़ात 6 ठिकाणी टाकल्या धाडी, 5 लाख 22 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी/ सातारा
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार जिह्यात पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारुन कारवाई केली. यामध्ये 5 लाख 22 हजार 120 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन दंगा करणाऱयांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
खंडाळा पोलिसांनी पारगाव ते बावडा जाणाऱया रस्त्यावर येडय़ा बाभळीच्या झाडाच्या आडोशाला चालणाऱया अवैध ताडी विक्रीवर छापा मारला. त्यामध्ये राजू आशाअण्णा गौंड (वय 40, रा. पारगाव) याच्या ताब्यातून 510 रुपये किमतीची 25 लिटर ताडी हस्तगत केली. शाहूपुरी पोलिसांनी माची पेठ ते बोगदा जाणाऱया रस्त्यावर शिंदे हॉस्पिटलसमोर विदेशी दारु विक्री करणाऱया सोमनाथ शांताराम दळवी (वय 52, रा. परळी), प्रकाश शिवराम माने (वय 60 रा. कौंदणी) या दोघांवर कारवाई करुन त्यांच्याकडून चार चाकी वाहनांसह विदेशी दारुच्या 48 बाटल्या, मोबाईल असा सुमारे 5 लाख 17 हजार 200 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. बोरगाव पोलिसांनी समर्थगाव येथील डी. पी. जैन कंपनीसमोर वडापावच्या टपरीसमोर बेकायदेशीरपणे चालणाऱया दारु अड्डय़ावर छापा टाकून कारवाई केली. करीम अजित शेख (वय 30, रा. मंगळवार पेठ कराड) याच्या ताब्यातून 1820 रुपयांच्या 26 दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या.
वडूज पोलिसांनी बोंबाळे येथे अवैध दारु विक्री करणाऱया सविता तानाजी पवार (वय 38) हिच्यावर कारवाई करुन 980 रुपयांच्या 14 दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या. कराड तालुका पोलिसांनी कासार शिरंबे येथील अंकुश पोपट यादव (वय 34) याच्यावर कारवाई करुन त्याच्या ताब्यातून 980 रुपयांच्या 14 बाटल्या हस्तगत केल्या. कराड शहर पोलिसांनी वारंजी गावच्या हद्दीत एम. एस. आर. डी. ए. ऑफिसच्या पाठीमागे झाडाच्या आड बेकायदेशीर दारु विक्री करणारा नवज्योत भाऊ सकट (वय 24) याच्यावर कारवाई करुन 630 रुपयांच्या 14 बाटल्या हस्तगत केल्या.
तसेच सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱयांवर कारवाई
औंध पोलिसांनी दत्त चौक औंध येथे सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन आरडाओरडा करणारा तानाजी तुकाराम निकम (वय 45, रा. भोसरे, ता. खटाव) याच्यावर कारवाई केली. दहिवडी पोलिसांनी फलटण चौकात अजित चंद्रकात जाधव (वय 23, रा. बिदाल) याच्यावर कारवाई केली. फलटण ग्रामीण पोलिसांनी वडजल येथे संदीप दशरथ रासकर (वय 40. रा. ठाकुरकी) यांच्यावर कारवाई केली.