रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीतील निसर्ग प्रेमी व भैरी भक्त यांच्या संकल्पनेतून आणि मंदिराचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबावाचा गाभारा हा विविध फुलझाडांची सजवण्यात आला . दुसऱ्या दिवशी ती झाडे मंदिर परिसरात लावण्यात येणार आहेत. तसेच त्यांचे संगोपन केले जाईल. पर्यावरण प्रेम व निसर्गाप्रती असलेली आपुलकी जपणारा हा उपक्रम प्रथम रत्नागिरीतील भैरी मंदिरात साजरा करण्यात आला. ०५/०६/२०२३ रोजी अनेक नागरिकांनी फुल झाडांच्या सहवासात असलेल्या भैरीबावा च्या रूपाचे दर्शन घेतले. यावेळी मनोमनी एक संकल्प करा की ” मी निसर्गाचे संरक्षण करेन , जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संगोपन करेन आणि हाच संदेश पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवेन ” अशी भावना देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे यांनी व्यक्त केली.