नवी दिल्ली
मर्सिडीज बेंझ यांनी जी 400 डी आणि जी 400 डी एएमजी या कार्स भारतीय बाजारपेठेत सादर केल्या आहेत. जर्मन कार निर्मिती करणाऱ्या या कंपनीने जी 350 डी हे नवे मॉडेल आणले आहे.
कंपनीच्या जी क्लास च्या दोन्ही नवीन जी 400 डी या मॉडेलची किंमत ही 2.55 कोटी रुपयांपासून सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. जी सध्याच्या जी 350 डी पेक्षा 83 लाख रुपये अधिक राहणार आहे. ग्राहकांना सदरची कार ही 1.5 लाख रुपये भरुन बुक करण्याची संधी मिळणार आहे. तसेच कंपनी वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कारची डिलिव्हरी सुरु करणार असल्याची माहिती आहे. कंपनीने तिला ऑफ रोड ड्रायव्हिंग सेटअपसह एक विशेष जी मोड दिला आहे.
इको प्रेंडली साहित्यांपासून निर्मिती
कंपनीने जी 400 डी मध्ये उच्च गुणवतेच्या पुनर्निमितीसाठी प्लास्टिकचे घटक वापरले आहेत. याशिवाय केबिनमध्ये लेटेक्स इमल्शनसह नारळाच्या फायबरच्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. बॅकरेस्ट कुशनिंग व लाकूड व तंतू केबिनच्या दरवाजाच्या पॅनेलसह संरचना वापरली आहे.
अन्य फिचर्स :
-ड्रायव्हिंग सेटअपसह विशेष जी मोड दिला आहे.
-कार 241 एमएमच्या ग्राउंड क्लिअरन्ससह व 700 एमएमपर्यंत वॉटर वेडिंग क्षमता
-विविध रंगामध्ये कार होणार उपलब्ध