8 महिन्यांपासून होता फरार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पुण्यातील रेकॉर्डवरील कुख्यात गुंडाला पुणे पोलिसांकडून चिपळूण शहरातून अटक करण्यात आल़ी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) तसेच विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर पुणे व लगतच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होत़े 8 महिन्यांपासून पोलिसांसाठी वाँटेड असलेल्या या गुंडाच्या अखेर चिपळूणातून मोठय़ा शिताफीने मुसक्या आवळण्यात आल्य़ा
सुरज संतोष ढवळे (19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आह़े मागील काही दिवसांपासून पुण्यापासून 200 किलोमीटर असलेल्या चिपळूण शहरात त्याने आश्रय घेतला होत़ा पुणे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, ढवळे हा चिपळुणात असल्याचे समोर आल़े त्यानुसार पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यातील पथकाने कारवाई करत ढवळे याला ताब्यात घेतल़े, अशी माहिती सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली. ढवळे हा हिंगणे-खुर्द येथील रहिवासी असून यापूर्वी खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुह्यात सहभागी असून पोलिसांनी त्याच्यावर ‘मकोका’ कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र ढवळे तेव्हापासून फरार असल्याचे पीआय महाजन यांनी सांगितले.
ढवळेच्या इतर साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली, मात्र ढवळे शहरातून पळून जाण्यात यशस्वी झाला होत़ा अधिक माहिती देताना महाजन म्हणाले की, ढवळे हा रत्नागिरी जिह्यातील चिपळूण येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना मिळाली होती. त्यानुसार आम्ही सापळा रचून रत्नागिरी जिह्यातून वॉन्टेड आरोपीला अटक केली, असे पोलिसांनी सांगितले. महाजन म्हणाले, आमच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या निर्देशानुसार एपीआय निकम, आबा उत्तेकर, देवा चव्हाण यांच्या पथकाने चिपळूणला जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आरोपीला अटक केली. या गुह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, एसीपी राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ढवळे याला अटक करण्यात आलेल्या अन्य पोलीस पथकांमध्ये पीएसआय गणेश मोकाशी, आबा उत्तेकर, संजय शिंदे, विकास पांडुळे, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओळेकर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, अमित बोद्रे आणि डॉ. अविनाश कोंडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावल़ी