बेळगाव : शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरल्याच्या आरोपावरून रायबाग पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चार लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. रायबागचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. अभिषेक बाळीकाई (वय 20) रा. कडट्टी, ता. हुक्केरी, शिवानंद हणबरट्टी (वय 19) रा. पामलदिन्नी, ता. गोकाक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भेंडवाड येथून ट्रॅक्टरची चोरी झाली होती. ट्रॅक्टर चोरणाऱ्या जोडगोळीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. ट्रॅक्टर चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. या दोघांवर रायबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Previous Articleआजच्या ‘फोन ईन’मध्ये वरिष्ठांचाही सहभाग
Next Article शरद पवारांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.