बेळगाव: भाग्यनगर येथील भंडारी कन्नड शाळेच्या विद्यार्थिनी लक्ष्मी मल्लाडी आणि निर्मला मल्लाडी या दोघी सख्या बहिणी इयत्ता चौथी आणि नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वी या आईचे छत्र हरविलेल्याने या मुलींचे शिक्षण शुल्क भरण्यास अडचण निर्माण झाली होती. याची माहिती संजीवीनी फौंडेशनच्या सल्लागार डॉ सुरेखा पोटे यांना समजली. त्यांनी आलायन्सच्या जागतिक सदस्या आणि जी जी चिटणीस स्कुलच्या मुख्याध्यापिका डॉ नविना शेट्टीगार व इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या कर्मचारी आरती सुभेदार यांनी या दोन्ही मुलींचे शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत केली आहे. यावेळी डॉ सुरेखा पोटे यांनी डॉ शेट्टीगार आणि सुभेदार यांचे आभार मानले.
Trending
- नेपाळ जिंकता जिंकता हरली
- शहराच्या विकासासाठी नवीन मास्टर प्लॅनला मान्यता
- काश्मीरसंबंधी आज उच्चस्तरीय बैठक
- ट्रॅव्हलर नदीत कोसळून 10 पर्यटकांचा मृत्यू
- वर्दीच्या रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई
- युगांडा ऑलआऊट 40, न्यूझीलंडचा दणकेबाज विजय
- यजमना जर्मनीची विजयी सलामी
- शैक्षणिक संस्थांकडून फसगत होणार नाही याची दक्षता घ्या