कोलकाता
कोलकाता विमानतळावर बुधवारी इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानाने धावपट्टीवर उभ्या असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला टक्कर मारली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेचे विमान कोलकात्यातून चेन्नईला जाण्यासाठी धावपट्टीवर प्रवेश मिळण्याची प्रतीक्षा करत होते. तेव्हाच इंडिगोच्या विमानाने टक्कर मारली आहे. या दुर्घटनेत एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या पंखाचे नुकसान झाले आहे.