अमेरिकेकडून जनरल बिपिन रावत यांचे अभिनंदन : दोन्ही देशांच्या सैन्यांमधील सहकार्य वाढण्यास मदत होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिका, ब्रिटन, चीन आणि फ्रान्सनंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) नियुक्त करणारा भारत पाचवा देश ठरला आहे. जनरल बिपिन रावत यांना पहिले सीडीएस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जनरल रावत हे सीडीएसचा पदभार आज स्वीकारणार आहेत. अमेरिकेने रावत यांचे भारताचे पहिले सीडीएस झाल्याबद्दल अभिनंदन करत या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या सैन्यामधील सहकार्य वाढणार असल्याचे म्हटले आहे.
सीडीएस दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान अधिकाधिक समन्वय वाढविण्यास मदत करणार असल्याचे उद्गार अमेरिकेचे मुख्य उपसहाय्यक सचिव (पीडीएएस) ऍलिस वेल्स यांनी काढले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात अलिकडेच पार पडलेल्या ‘टूप्लसट’t चर्चेत सीडीएसवर चर्चा करण्यात आली होती. दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान युद्धाभ्यास तसेच माहितींची देवाणघेवाणीचा मुद्दाही उपस्थित झाला होता.
भारत सरकारने पहिल्यांदाच सीडीएस या पदाची निर्मिती केली आहे. जनरल रावत यांनी 31 डिसेंबर रोजी सैन्यप्रमुख म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. रावत आता सीडीएस म्हणून 2022 पर्यंत सेवा बजावणार आहेत. तिन्ही संरक्षण दलांदरम्यान ताळमेळ राखण्यात त्यांची मुख्य भूमिका असणार आहे.
विविध देशांमधील व्यवस्था
अमेरिका : अमेरिकेतील चेअरमन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी (सीजेसीएससी) हे पद भारताच्या सीडीएस समान आहे. हा अधिकारी अमेरिकेचे अध्यक्ष आणि संरक्षणमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षा तसेच अंतर्गत सुरक्षेवर थेट सल्ला देतो. जनरल जोसेफ डनफोर्ड हे सध्या सीजेसीएससी आहेत.
sब्रिटन : येथील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच सैन्याचा प्रमुख असतो. तो संरक्षणमंत्री आणि पंतप्रधानांचा मुख्य सुरक्षा सल्लागार असतो. मंत्रालयाच्या अप्पर सचिवांसोबत मिळून नियोजन आणि योजनांवर तो काम करतो. जनरल सर निक कार्टर हे विद्यमान सीडीएस
आहेत.
s®ााrन : जॉइंट स्टाफ डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल मिलिट्री कमिशनच पीपल्स लिबरेशन आर्मीची सर्वोच्च संस्था आहे. सेंट्रल मिलिट्री कमिशन अंतर्गत ही यंत्रणा काम करते. याचे मुख्यालय बीजिंगमध्ये असून जनरल ली जोउचेंग हे याचे प्रमुख
आहेत.
sफ्रान्स : येथील चीफ ऑफ स्टाफ ऑफ आर्मीज हा सर्व संरक्षण दलांचा प्रमुख असतो. तो सर्वप्रकारच्या सैन्य मोहिमांचे नेतृत्व करतो. नियोजनापासून अंमलबजावणी पर्यंत सर्व मोहिमांची जबाबदारी त्याच्यावरच असते. जनरल फ्रांकोसिस लॅकोत्रे हे सध्या या पदावर आहेत.