ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱया हल्लेखोरांवर आज सकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. त्याआधारेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या हल्लेखोरांची नावे मात्र अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत.
यामध्ये मालमत्तेचे नुकसान, हिंसाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना उपचारानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. एम्सकडून याबाबत एक बुलेटिन जारी करण्यात आले असून 34 विद्यार्थी रुग्णालयात दाखल होते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.