ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातमधील गांधीनगरमध्ये 26 वर्षीय शिक्षिका शाळेतीलच आठवीत शिकणाऱया 14 वर्षीय विद्यार्थ्यासोबत पळून गेली आहे. मागील वर्षभरापासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते.
गांधीनगरच्या कलोल सिटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थी आणि शिक्षिकेचे हे प्रेमप्रकरण सर्वश्रृत होते. त्यामुळे शाळेनेही दोघांना वारंवार बजावले होते. दोघांच्याही घरच्यांना या प्रकरणाची माहिती होती. दोघांच्याही नात्याला घरच्यांकडून परवानगी नव्हती. त्यामुळे शुक्रवारी चार वाजता हा मुलगा घराबाहेर पडला. त्याचा आम्ही शेजारी आणि नातेवाइकांकडे शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. या शिक्षिकेच्या घरी गेलो होतो, पण तिथेही तो नव्हता. दोघेही मोबाईल घरी ठेऊन गेले आहेत. त्यामुळे शिक्षिकेनेच माझ्या मुलाला फूस लावून पळून नेले, असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. अद्याप या दोघांचाही तपास लागू शकला नाही.