ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नव्या झेंडय़ाचे अनावरण करण्यात आले. नवा ध्वज भगव्या रंगाचा असून या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात होतंय. महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून, त्यांना अभिवादन केले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण केले. आज संध्याकाळी राज ठाकरे आपली भूमिका मांडणार असून ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.