प्रतिनिधी/ पेडणे
पेडणेच्या अस्तित्वासाठी पेडणे करांनी एकसंघ होऊन क?सिनोसाठी जामिनी हडप करणाऱया क?सिनो ला?बिच्या विरोधात आता लढा देणे गरजेचे असून युवा पिढी आणि भावी पिढीसाठी पूर्वजांनी ज्या जमिनी राखून ठेवल्या त्या संभाळून ठेवण्यासाठी सर्व पेडणेकर एक होऊया असा एल्गार पेडणे येथे गोयचो आवाज या संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या सभेत देण्यात आला.
पेडणे तालुक्मयात कोणत्याही परिस्थितीत क?सिनो आणू दिला जाणार नाही, असा इशारा सभेत देवून वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. पेडण्यात कुठेच केसिनो नको, मास्टर टुरिझम आराखडा पंचायती व लोकाना विश्वासात घेवून करावा, तालुक्मयात ध्वनिप्रदूषण नको, शहरीकरण गावाना करण्यास विरोध, आमच्या गावात डोंगरमाळरानावर मेघा प्रकल्प नको , आणि विधानसभा बरखास्त करून पुन्हा नव्याने निवडणुका घ्याव्यात असे सहा ठराव गोयचो आवाज संघटनेच्यावतीने सभेत घेण्यात आले.
पेडणे तालुक्मयातील लाखो चौरास मीटर क?सिनो माफिया ल?बिने विकत घेतली असून भविष्यात पेडणेकरांना जमिन शिल्लक राहणार नाही. यासाठी आतापासून पेडणेकर जागे व्हा असे आवाहन केले.यावेळी पेडणे तालुक्मयातील क?सिनो साठी ज्या जमिनी घेण्यात आल्या त्याची माहिती स्क्रीनवर दाखविण्यात आली.
पेडणे तालुक्मयातील लाखो चौरस मीटर जमीन केसिनो उभारण्यासाठी जयदेव मोदी यांनी घेतलेल्या आहेत . त्याचे सर्व्ह? नंबर व जमिनी कुठे किती चौरस मीटर घेतल्या त्याची पूर्ण माहिती यावेळी सभेत देण्यात आली.
गोयचो आवाज संघटनेतर्फे पेडणे येथील व्हायकाऊंट हायस्कूलच्या मैदानावर रविवारी 2 रोजी केसिनो विरोधात जाहीरसभा आयोजित केली होती . या सभेला पेडणे तसेच गोव्याच्या विविधा भागातून नागरिक उपस्थित होते.
या सभेला खास उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर तसेच मांदेचे आमदार दयानंद सोपटे याना निमंञीत केले होते. तसेच माजी मुख्यमंत्री यानाही निमंञीत केले होते. सभेत दोन आरक्षित करून दोन खुर्च्यावर त्यांच्यावरा उपमुख्यमंञी बाबू आजगावकर व आमदार दयानंद सोपटे नावाचे लेबल लावून ठेवले होते .ते नागरिकांचे लक्ष वेधीत होते .ते दोन्ही प्रतिनिधी सभेला आले. .
या सभेत सर्व वक्त्या?नी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची त्यांच्या पत्नीची निवडणुकीपूर्वी किती मालमत्ता होती , व नंतर कशी वाढली ,मुलाने काहीच इन्कम नसताना ओडी एक कोटीची गाडी घेतली कशी , सनबर्न पार्त्यी दहानंतर बाबू आजगावकर यांच्या हॉटेलात सुरु झाली ती पहाटे पर्यंत चालली , सनबर्न पार्टी कुणासाठी , असा सवाल उपस्थित करून बाबू आजगावकर यांच्या वाढत असलेल्या मालमत्तेचा तपशील या सभेत सादर केला .
पेडणेत आसला आयात उमेदवार नको
या पुढे पेडणे मतदार संघात कोणत्याच पक्षाच्या उमेदवार हा तालुक्मयाबाहेरचा आयात केलेला उमेदवार नको अशी मागणी केली .
सनबर्न पार्टीत कसे मेले
यावेळी डिसेंबर महिन्यात झालेली सनबर्न पार्टीत पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी जे तिघेजण मृत्यू झाला त्याचा मृत्यू कसा झाला ते जाहीर करावे . ते सनबर्न पार्टीत मेलेले पर्यटक कशाने मेले ते जाहीर करण्याचे आवाहन केले .
बंद केलेले मोपाचे काम 48 तासात चालू कसे ?
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी मोपाचे काम आपल्या समर्थाकाना घेवून बंद पाडले होते . ते काम परत 48 तासात कसे चालू केले असा सावल वक्त्या?नी उपस्थित केला . जर स्वाभिमानी पेडणेकर तुम्ही असाल तर तुम्हाला आयात केलेला उमेदवार कशाला हवा असा प्रश्न उपस्थित केला .
सभेला जाऊ नका
क?प्टन विरायतो फेर्नंडीस यांनी दावा करताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी नागरिकांना आजच्या सभेला जावू नका असा दबाव आणि भीती घातली . बाबू आजगावकर यांचे या सभेत आम्ही भांडा फोड करणार आहोत म्हणूनच नागरिकाना त्यांनी रोखून धरल्याचा दावा केला . उत्तर दक्षिण बेदाभेव हे राज्यकर्ते आपल्या स्वार्थासाठी करतात . टीसीपी मंत्री विजय सरदेसाई असताना बफर झोन बदलून सेटलमेन्त झोन करून लुबाडले. आता बाबू आजगावकर हे गेम्ब्ल?िग झोन ऐवजी गेमिंग झोन म्हणून पेडणेकरांची आणि गोमंतकीय जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी सांगितले . पूर्ण किनारी भागातील जमनीवर केसिनो आणले जाणार असल्याचा दावा क?प्तन फर्ना?डिस यांनी केला . पर्रीकर यांनी 2012 साली केसिनो बंद करण्याची घोषणा केली त्याचे काय झाले हे गोवेकरांनी बघितले असा दावा केला .
पेडणेत चांगले प्रकल्प आणाः सुभाष केरकर
मोपा विमानतळासाठी एक कोटी जमीन आणि पाच गावाचा पिडीयेत समावेश करून आणखी दोन कोटी जमिनिवर गदा आणलेली आहे . उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडण्यात काय केले ते जाहीर करावे ,त्यांनी एक तरी प्रकल्प गेल्या 15 वर्षात पेडणेत आणला. ज्यातून रोजगार मिळाला तर दाखवावा असे जाहीर आवाहन सुभाष केरकर यांनी केले .
रामराज्याच्या नावावर रावण राज्य
कळंगुट येथून खास सभेसाठी आलेले ओल्ट? लोबो यांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर खरमरीत टीका केली . केंद्रात रामराज्याच्या नावावर रावण राज्य आणले आणि राज्यातही तीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे . केसिनो आले तर तुमच्या मुलींची ड्रग्स माफिया विक्री करतील असा दावा लोबो यांनी केला . भावी पिढीचेभवितव्य धोक्मयात आहेयासाठी क?सिनोला विरोध करा असे आवाहन केले.
ड़ व्यंकटेश नाईक
वकील व्यकटेश नाईक यांनी भू माफियांकडून पेडणेकरांनी आपल्या जमिनी वाचवाव्यात , जमिनीसाठी कायदा आहे त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन केले . जमिनी कुणी विकल्या असा सवाल करून जमिनी विकल्या म्हणून केसिनो येत आहे . आमची जागा ड्रग्स , वेश्याव्यवसाय व केसिनोसाठी नको असा निर्धार करुया असे आवाहन केले .
रामकृष्ण जल्मी यांनी केसिनोचे दुष्परिणाम काय होतील ते जाहीर करुध पेडणेकरानी आता सावधा रहा असे आवाहन केले.
वकील जितेंद्र गावकर , विनायक चारी ,प्रसाद शहापूरकर , आदींनी विचार मांडले . स्वप्न?श शेल्ड?कर यांनी पुराव्यानिशी बाबू आजगावकर यांच्या मालमत्तेचा तपशील सादर केला . राष्ट्रगीताने सांगता सभेची झाली .