ऑनलाईन टीम / नवी मुंबई :
खारघर येथे कार्यरत असलेल्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी सहा जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
खारघर येथे केंद्रीय सुरक्षा बलाचे 139 अधिकारी आणि 12 जवान तैनात आहेत. त्यामधील पाच जवानांना यापूर्वीच कोरोनाचा संसर्ग झाला होता. उर्वरित 146 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुरुवारी रात्री महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालय कळंबोली येथे ठेवण्याचे आदेश शासनाने जारी केले होते. त्यानुसार त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आणखी सहा जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
CRPF च्या जवानांसाठी एमजीएम हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आल्या असून, त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.