वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे या देशातील अनेक माजी व विद्यमान क्रिकेटपटूंना आर्थिक मदतीची जरूरी भासत असल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेने 250,000 अमेरिकन डॉलर्सचा तातडीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या संकटामुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही विपरित परिणाम होत असल्याने बऱयाच माजी क्रिकेटपटूंना शासनाकडून मदतीची वाट पाहावी लागत आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या आर्थिक मिळकतीवर कोरोना व्हायरसचा विपरित परिणाम झाल्याचे जाणवते. ऑस्ट्रेलियाच्या काही माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंना मंडळाकडून मिळणाऱया वेतनावर अवलंबून राहावे लागते. सध्या देशातील कोरोना व्हायरस संकटामुळे अनेकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान क्रिकेटपटूंना तातडीची आर्थिक मदत मंडळाकडून मिळण्यापूर्वी त्यांना या तातडीच्या मदतनिधीचा फायदा होवू शकेल. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेने तातडीच्या मदतीसाठी निधी उभारण्याची योजना अंमलात आणली आहे. देशातील गरजू क्रिकेटपटूंनी या संघटनेशी संपर्क साधावा, असे या संघटनेचे सरव्यवस्थापक ऍपलबी यांनी सांगितले.