जगातील एकमात्र नेते
कोरोना विरोधातील युद्धात हायड्रॉक्सी क्लोरोक्विन टॅबलेटच्या निर्यातीला भारताने मंजुरी दिल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची प्रंशसा करण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना महान नेते ठरविले आहे. अमेरिकेसाठी पंतप्रधान मोदींचे असलेले महत्त्व व्हाइट हाउसच्या ट्विटर हँडलद्वारे फॉलो केल्या जाणाऱया यादीतून स्पष्ट होते. व्हाइट हाउस एकूण 19 हँडल फॉलो करतो, यात 4 भारताशी संबंधित उर्वरित अमेरिकेतील आहेत. या 4 हँडल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वैयक्तिक हँडल, भारतीय राष्ट्रपतींच्या कार्यालयाचे हँडल, पीएओ ऑफिस हँडल आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे हँडल सामील आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हाइट हाउसकडून फॉलो केले जाणारे जगातील एकमात्र नेते आहेत.
कोरोना विरोधी लढय़ात भारताने अमेरिका आणि ब्रिटनसारख्या जागतिक शक्तींसह अनेक देशांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. याप्रकरणी तेथील नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे प्रचंड कौतुक केल्याने लोकांमधील भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. विकसित आणि विकसनशील देशांच्या नेत्यांमध्ये केवळ मोदींना फॉलो करण्यात आल्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद ही बाब आहे.
भारताशी संबंधित अधिकारी
व्हाइट हाउस 19 हँडलना फॉलो करते आणि यातील दोन जण भारताशी अप्रत्यक्ष स्वरुपात जोडले गेले आहेत. यात भारतातील अमेरिकेचा दूतावास आणि राजदूत केन जस्टर यांचा समावेश आहे. यातून अमेरिका राजनयाच्या दृष्टीकोनातून भारताला देत असलेले महत्त्व आणि भारताच्या प्रत्येक हालचालीवर त्याची नजर असल्याचे स्पष्ट होते.
कोरोना संकटात स्वतः अडचणींमध्ये असूनही मदतीचा हात पुढे करणारा भारत एकमात्र देश आहे. तसेच पूर्ण जगाला एकजूट करण्याचे प्रयत्न भारताकडून होत आहेत. सार्क तसेच जी20 बैठकीसाठी भारतानेच पुढाकार घेतला होता. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिदिन जागतिक नेत्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत आहेत.