ऑनलाईन टीम / लंडन :
कोरोनामुळे आणखी एका कलाकाराचा बळी घेतला आहे. ब्रिटनचे प्रसिद्ध कॉमेडियन टिम ब्रुक-टेलर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 79 वर्षांचे होते.
टिम ब्रुक-टेलर यांच्या यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 1960 मध्ये टीव्ही आणि रेडिओ वर कॉमेडी करायला सुरुवात केली होती.
ब्रुक-टेलर हे गुडीज या तीन लोकप्रिय विनोदी कलाकारांच्या टीम मधील एक होते. या ग्रुपमध्ये ब्रुक यांच्यासोबत ग्रीम गार्डन आणि बिल ऑडी होते. त्याचबरोबर 1975 मध्ये आलेले त्यांचे गाणे ‘फंकी गिबन’ हे खूप प्रसिद्ध होते.
ब्रुक यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.