विविध क्लिंजर्स, मेक अप उत्पादनांमध्ये घातक रसायनं असतात. या रसायनांमुळे त्वचेचं नुकसान होतं. हे टाळण्यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असणार्या नैसर्गिक घटकांपासून क्लिंजर्स बनवू शकता.
- त्वचा कोरडी असणार्यांनी लिंबू आणि संत्र्याच्या सालीचा वापर करून क्लिंजर बनवावं. संत्रं आणि लिंबाच्या सालीतल्या घटकांमुळे त्वचेची रोमछिद्रं स्वच्छ होतील. हे मिश्रण तयार करण्यासाठी दहा चमचे बदाम तेल, दहा चमचे ऑलिव्ह ऑईल आणि पाच चमचे लिंबाचा रस हे साहित्य घ्या. हे मिश्रण एका बाटलीत भरून ठेवा. आता संत्र्याची सालं वाळवून पूड करून घ्या. तुम्ही बाजारात मिळणारी पावडरही वापरू शकता. चमचाभर संत्र्याची पूड घ्या. त्यात हे मिश्रण घाला आणि चेहर्याला मसाज करा. यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होऊन जाईल.
- टोमॅटो हा नैसर्गिक क्लिंजर आहे. मुलायम आणि तजेलदार त्वचेसाठी अर्धा टोमॅटो चेहर्यावर घासा किंवा टोमॅटोचा रस चेहर्याला लावा. वाळल्यावर धुवून टाका. यामुळे त्वचेतली रोमछिद्रं खुली होतील.
- दह्यामुळे त्वचेचं आरोग्य राखलं जातं. रात्री दोन चमचे दह्याने चेहर्याला मसाज करा. वाळल्यावर धुवून टाका. चेहरा तजेलदार दिसेल.
- तुमच्या चेहर्याचा काही भाग कोरडा आणि काही भाग तेलकट असेल तर पपईचा वापर करा. दोन चमचे दुधात पपईचा गर मिसळा. त्यात ओटमील घाला. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. यामुळे चेहरा आणि मानेचा काळपटपणा दूर होईल.
- तेलकट त्वचेवर मुलतानी माती खूप प्रभावी ठरते. त्यामुळे मुलतानी मातीचा पॅक तयार करून त्वचेवर लावा. दोन चमचे मुलतानी मातीत चिमूटभर कापूर पावडर आणि थोडं पाणी घाला. हे मिश्रण चेहर्यावर लावा. वाळल्यावर धुवून टाका.