ऑनलाईन टीम / बर्लिन :
दहशतवादाच्या संशयावरून जर्मन पोलिसांनी तजाकिस्तानच्या पाच नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले पाचही नागरिक इस्लामिक स्टेटचे दहशतवादी असल्याची माहिती जर्मन पोलिसांना मिळाली आहे.
रावसन बी, अजीजजोन बी, मुहम्मदली जी, फरहोशोह के आणि सुनतुलोख के अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
स्थानिक सरकारी वकिलांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, उत्तर राइन-वेस्टफेलियाच्या पश्चिमेकडील राज्यात सहा ठिकाणांवर बुधवारी छापा टाकून चार संशयितांना अटक करण्यात आली. तर एकाला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. हे पाचही नागरिक जर्मनीत तैनात असलेल्या अमेरिकन लष्करावर हल्ला करण्याचा कट आखत होते.
अटक करण्यात आलेले पाचही संशयित अफगाणिस्तानातातील आयएसच्या दोन बड्या नेत्यांच्या आदेशावरून जर्मनीत आले आहेत.जर्मनीतील अमेरिकन लष्करावर हल्ला करण्यासाठी त्यांनी बंदुका आणि स्फोटकेही जमवून ठेवली होती. तसेच बॉम्ब तयार करण्याचे साहित्यही त्यांनी यापूर्वीच ऑनलाईन बुकिंग करून ठेवले होते.