वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
देशातील दिग्गज सॉफ्टवेअर सेवा देणारी प्रसिद्ध कंपनी विप्रोने मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील (जाने-मार्च 2020) निक्वळ नफा कमाईची आकडेवारी सादर केली आहे. वार्षिक पातळीवरील आकडे पाहिल्यास या तिमाहीत कंपनीचा नफा 6.3 टक्क्मयांनी घटून 2,326.1 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. यात मागील तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर 2019 तिमाहीच्या तुलनेत मार्च तिमाहीच्या नफ्यात 5.28 टक्क्मयांनी घसरण नोंदवण्यात आली आहे.
मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 4.69 टक्क्मयांनी वधारुन 15,711 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. जे मागील वर्षात समान तिमाहीत 15,006.3 कोटी रुपये इतके राहिले होते. माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागातील उत्पन्न मार्च तिमाहीमध्ये डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 1 टक्क्मयांनी घटून 2,07.37 कोटी डॉलरच्या घरात पोहोचले होते. उत्पन्नासोबत कंपनीच्या समभागांवर मार्च तिमाहीमध्ये 4.09 रुपयावर उत्पन्न राहिले आहे. जे डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 1.1 टक्क्मयांनी कमी राहिले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 14 जानेवारी 2020 रोजी अंतरिम लाभांशसाठी 1 रुपयाची घोषणा केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे भविष्यातील होणाऱया उत्पन्नाच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारची आकडेवारी मांडण्यात आलेली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन वाढविण्यात आल्यामुळे देशातील कोरोनाचे संकट कमी झाल्याशिवाय नफा कमाई संदर्भातील कोणत्याही प्रकारचे अंदाज सादर करण्यात येणार नसल्याचेही विप्रोने सांगितले आहे.