डिचोली मतदारसंघातील पाण्याची समस्या सोडवियास प्राधान्य : आमठाणे येथे नवीन जलशुध्दीकरण प्रकल्प.
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली मतदार संघ व परिसरातील पाणी समस्या कायमची निकालात काढण्यासाठी नवीन योजना आखण्यात आल्या असून धुमासे आमठाणे पठारावर 10″एम एल डि क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार. त्यासाठी 47 कोटी रुपये मंजूर करण्यात असून त्यानंतर डिचोली मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील पाण्याची समस्या कायमची सुटणार. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊस्कर यांनी दिली.
मंत्री दिपक पाऊस्कर यांनी आज डिचोली तसेच पाडोशे जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन डिचोली तालुक्मयातील पाणी पुरवठा व रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
डिचोलीत पाणी पुरवठा समस्या निर्माण झाल्याने लोकांना 12 दिवस त्रास झाले ते पुन्हा होऊ नये या साठी सभापती राजेश पाटणेकर यांनी खास विनंती करून मंत्री पाऊस्कर यांंना डिचोलीत येण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी डिचोलीत दाखल होताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नूतन कार्यालयात अधिकारी वर्गाची तातडीची बैठक घेऊन पाणी व रस्ता कामाचा सविस्तर आढावा घेतला.
पडोशेतील जुना पंप दुरुस्त केला असून नवीन पंप दाखल झाला आहे. परंतु महाराष्ट्रातील पंप बसविणाऱया टीमला गोव्यात कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे येण्यास मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे नवीन पंप बसविण्याचे काम होऊ शकले नाही. त्याचे काम लवकरच सुरू करू असे मंत्र्यानी सांगितले.
डिचोली तालुक्मयातील मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आदेश आज मंत्री पाऊस्कर यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालायातून आवश्यक परवानगी घेऊन स्थानिक आहेत त्या कामगारांना घेऊन सर्व कामे 15 मे पूर्वी पूर्ण करा, असे आदेश यावेळी देण्यात आल्याची माहिती मंत्री पाऊस्कर व सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली.
यावेळी अधिकारी नितीन नेवेरेकर, विलास तामोस्कर, धानो गावकर, रश्मी मयेकर, वासुदेव परब, रोहिदास नाईक आदी अधिकारी उपस्थित होते.
लईराई देवीच्या धोंडगणांची पाण्यासाठी समस्या होऊ नये
सभापती राजेश पाटणेकर यांनी लइराई देवीच्या धोंडांचे व्रत घरो घरी सुरु होणार असून पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्व ती खबरदारी घेण्याचे आदेश यावेळी दिले. तसेच मतदार संघातील रस्ते कामाचा आढावा घेताना उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्री पाऊस्कर याना सांगितले.
यावेळी पाऊस्कर यांनी डिचोली तालुक्मयातील पाणी पुरवठा कसा होतो काय समस्यां आहेत व उपाययोजना तातडीने करण्याबाबत सविस्तर चर्चा केली व यापुढे समस्या निर्माण होऊ नये यासाठी नवीन पंप बसवणे व इतर सुविधा पुरवणे याबाबत आढावा घेतला.