प्रतिनिधी/कोल्हापूर
आयसोलेशय हॉस्पिटल पाठोपाठ आता सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा नवीन अत्याधुनिक वॉर्ड उभारण्यात येणार आहे. सध्याच्या कोरोना आणि नंतरच्या काळातील रूग्णांना हा नवीन वॉर्ड उपयुक्त ठरणार आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकाराने या वॉर्डची उभारणी होत आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आणखीन सक्षम सेवा देवू शकणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविल्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने सीपीआरच्या साथीला आयसोलेशन हॉस्पिटलही सुविधांनी सुसज्ज ठेवले आहे. सध्या या हॉस्पिटलच्या तळ मजल्यावर तीस बेड आहेत. आता पहिल्या मजल्यावर 60 बेडचा वॉर्ड उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या वॉर्डमध्ये पुरूष आणि महिला रूग्णांसाठी प्रत्येकी 30 बेड असतील. त्याचबरोबर डॉक्टर, नर्स, ब्रदर्ससाठी रूम असेल. इतर सुविधाही असतील. या वॉर्डचा नकाशा तयार करण्यात आला असून लवकरच हा वॉर्ड आकारास येणार आहे.
आयसोलेशन पाठोपाठ सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये वॉर्ड
सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या मुख्य दगडी इमारतीत सध्या प्रसुती विभाग आहे. तर सामोरच्या विभागात इतर आजाराच्या रूग्णांवर उपचार केले जातात. मुख्य इमारतीतील तिसऱया मजल्यावर तब्बल 1200 स्क्वेअर फुटाच्या जागेत प्रशस्त वॉर्ड उभारण्याच्या सूचना आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी केल्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील याच्ंयाशी चर्चा करून वॉर्डचा आराखडा तयार केला आहे. शनिवारी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, सावित्रीबाई फुले हॉस्पिटमधील डॉ. रमेश जाधव यांच्यासह शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पाहणी केली. यावेळी आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱयांनी दिलेल्या सूचनानुसार वॉर्डची उभारण्याची करण्याच्या कामाचे नियोजन शहर अभियंता सरनोबत यांनी केले. सोमवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे.
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी शनिवारी पाहणी करून वॉर्ड उभारणी संदर्भात काही सूचना आणि मार्गदर्शन केले. त्यानुसार सोमवारपासून प्रत्यक्षात वॉर्ड उभारणीच्या कामाला प्रारंभ होईल. -नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, कोल्हापूर महापालिका