वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरस महामारीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडास्पर्धा ठप्प झाल्याने क्रीडापटूंना आपल्या निवासस्थानी कालावधी घालवावा लागत आहे. भारताचा माजी कर्णधार कपिलदेवचा नवा फोटो इंटरनेटवर प्रसिद्ध झाला. या छायाचित्रात कपिलदेवने विंडीजचा माजी कर्णधार सर व्हीव्हीयन रिचर्डस् यांच्याप्रमाणे दाढी राखली आहे. रिचर्डस् आणि महेंद्रसिंग धोनी हे आपले हिरो असल्याचे कपिलदेवने म्हटले आहे.
रिचर्डस् यांचे दाढी वाढविलेले छायाचित्र पाहून मलाही प्रोत्साहन मिळाले. रिचर्डस् यांच्याप्रमाणे आपणही दाढी वाढविण्याचा निर्णय घेतला. तसेच 2007 साली आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर कर्णधार धोनीने आपल्या केस रचनेमध्ये बदल केला होता. धोनीप्रमाणे आपणही का बदल करू नये, असा प्रश्ऩ माझ्यासमोर उभारला. पण रिचर्डस् आणि धोनी या हिरोच्या नव्या लुकने आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन कपिलदेवने केले.