प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरानजीक असणा-या पोमेंडी खुर्दमधील शेतकरी आणि ग्रामस्थांनी आर्थिक मदत गोळा केली आहे. हा गोळा केलेला सुमारे 32 हजार 541 रुपयांचा निधी कोरोना मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून सुर्पूद केला आहे.
पोमेंडी खुर्द गावात जवळपास 90 टक्के लोक हे शेतकरी कुटूंबातील आहेत आणि या शेतीवर त्यांचा उदर्निर्वाह अवलंबून असतो. राज्य शासनाला मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी शेतक-यांना आणि ग्रामस्थांना मदतीचं आवाहन केलं होतं. त्याला उत्स्फुर्त असा प्रतिसाद देत ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जवळपास 32 हजार 541 रुपयांची मदत शेतकरी आणि ग्रामस्थांनी गोळा केली. ही मदत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. या मदतीता डिडी जनरल तहसिलदार राजेंद्र बिर्जे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. राज्यशासनाच्या या लढय़ात पोमेंडी खुर्दमधील ग्रामस्थांनी मदतीचा थोडासा हातभार लावला आहे.