तरुण भारत संवाद, प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात कोरोनाबाधित आणखी 21 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 14 पुरुष, 7 महिलांचा समावेश आहे. सोलापुरात कोरोनाची संख्या 102 वर पोहोचली आहे. आजपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 96 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याच. माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज गुरुवारी दिली. आज आढळलेल्या रुग्णांपैकी शास्त्रीनगर 5, शानदार चौक 9, मोदी 4, सदर बझार 1, नई जिंदगी 1, कुरबान हुसेन नगर 1, शनिवार पेठ , असे एकूण 21 नवीन कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.आज एकूण 205 अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी 184 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर उर्वरित 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 1650 व्यक्ती होते त्यापैकी 1455 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 1353 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर 195 व्यक्तीचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. एकूण 102 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात नव्याने 21 कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे व कोरणा बाधित रुग्णांचा आकडा 100 हुन अधिक झाल्यामुळे सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.