जि.प सदस्या मनिषा माने यांचा भादाेले जि.प. मतदार संघात उपक्रम
टोप / प्रतिनिधी:
सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परीषद सदस्या मनिषा विजयसिंह माने यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कार्य करणाऱ्या भादाेले जिल्हा परीषद गटातील गरजु व आशा वर्कर यांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने व जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांच्या हस्ते व सरपंच बी.एस. अबंपकर, उपसरपंच राजेंद्र माने याच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
भादाेले जिल्हापरीषद मतदार संघातिल गावात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली आहे. घराेघरी मास्क व सॅनिटायझर वाटप केले आहे. व्हॉट्सअॅप फेसबुकच्या माध्यमातून काेराेणाविषयी जनजागृती केलीआहे.समाजातील गरजुना दहा टन जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले आहे. घराेघरी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव राेखण्यासाठि काेणकाेणत्या उपाययोजना कराव्या यासाठी माहीती पत्रक वाटप केलेले आहे. आठ गावातील अहोरात्र कोराेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर सर्वेक्षण करणाऱ्या मतदार संघातील ५० आशा वर्कर यांच्यासह १५०० कुटुंबांना १५०० वस्तुचे जीवनावश्यक किटचे वाटप जिल्हापरीषद सदस्या मनिषा माने यांच्या वतिने करण्यात आले .
विविध शासकिय कार्यालये, पोलीस स्टेशन, भाजी विक्रेते, हॉस्पिटल्स ग्रामिण भागातील सेवा संस्था, प्राथमिक आराेग्य केंद्रे, महानगरपालिका, नगरपरिषद सफाई कामगार यांना मास्क व सॅनिटायझरचा वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती बाळास माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली. यावेळी कार्यक्रमास माजी सरपंच वर्षांरानी माळी, उषाताई माने, दिपश्री माने, शाेभा पाटील, संगीता डाेंगरे, संदिप माने, सतिश माेरे, विनायक माेरे(तात्या), ग्रामविकास आधिकारी एस.डी. मुसळे, राजु काळे, श्रीकांत माळी, जग्गनाथ वाघमाेडे, मारुती खारकांडे, अबंपच्या कोराेना दक्षता समिती सदस्य, आशा वर्कर उपस्थित होते.