वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडमधील मेरेलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) लंकेचा माजी कर्णधार कुमार संगकार यांना अध्यक्षपदासाठी दुसऱयांदा ऑफर दिली आहे. संगकारा एमसीसी क्लबचे विद्यमान अध्यक्ष असून जागतिक स्तरावर कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण घडी विसकटली असल्याने संगकाराना मुदतवाढीची ऑफर एमसीसीने दिली आहे.
लंकेचे माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज कुमार संगकारा येंची गेल्यावर्षीच्या 1 ऑक्टोबर रोजी एमसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. एमसीसी क्लबचे अध्यक्षपद भूषविणारे संगकारा हे पहिले बिगर ब्रिटीश नागरिक आहेत. इंग्लंडमध्ये कोरोना महामारीचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत असल्याने संपूर्ण देशातील क्रिकेट क्षेत्राला मोठा आर्थिक धक्का बसला आहे. संगकाराने 1 ऑक्टोबर 2019 रोजी एमसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतली होती. आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी संगकाराकडेच ठेवण्याचा निर्णय या क्लबच्या पदाधिकाऱयांनी घेतला असून या संदर्भात संगकाराला अध्यक्षपदाच्या मुदतीत वाढ देण्याबाबत या क्लबच्या होणाऱया वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अधिकृत मंजुरी दिली जाईल. सदर बैठक 24 जूनला बोलाविण्यात आली आहे.