वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीला चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफा 22.8 टक्क्मयांनी वाढून 3,154 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षात 2018-19 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 2,568 कोटी रुपयांचा होता.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या लेखा मानांकनानुसार समीक्षकाप्रमाणे त्यांचे उत्पन्न 16.3 टक्क्मयांनी वधारुन 18,590 कोटी रुपये झाले आहे. या अगोदरच्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत हा आकडा 15,990 कोटींवर स्थिरावला होता तर 2019 व 20 च्या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 9.3 टक्क्मयांनी वधारुन 11,062 कोटांच्या घरात पोहोचला आहे.
कोरोना संकटाच्या काळात विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यासारख्या कंपन्यांप्रमाणे अन्य टेक कंपन्यांनी आपल्या नफा कमाईचे आकडे सादर केलेले नाहीत. एचसीएल टेकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सी. विजयकुमार यांनी 2019-20 या काळातील आमच्या कंपनीची कामगिरी समाधानकारक राहिली असल्याचे सांगितले आहे.