प्रतिनिधी / बेंगळूर
जीवघेण्या कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडल्या आहेत. आता लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत असल्याने म्हैसूर विद्यापीठाने प्राध्यापक आर्हता परीक्षा (के-सेट) परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. 21 जून 2020 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
यापूर्वी कर्नाटक प्राध्यापक आर्हता परीक्षा 12 एप्रिल रोजी घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र लॉकडाऊनमुळे ही परीक्षा झाली नाही. आता परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱया उमेदवारांना म्हैसूर विद्यापीठाकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. 25 मे पर्यंत 250 रुपये दंडासह नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय के-सेट परीक्षेसंबंधी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.