प्रतिनिधी/शाहूवाडी
शाहूवाडी तालुक्याच्या चिंतेत चांगलीच भर पडली असून कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढच झाली आहे. दिवसभरात १५ पॉझिटिव्ह रिपोर्ट आले असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. तर एकुण रूग्ण संख्या गेली 3५ वर गेली असल्याने तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
बाहेरून येणारी संख्या वाढू लागल्याने भितीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने ही दक्षता घेतली आहे. नागरिकाामो घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, बाहेरून आलेल्या नागरिकांनीही अलगीकरणातच रहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री दोन व मंगळवारी सायंकाळी 15 असे एकूण 17 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने तालुक्यातही खळबळ माजली आहे. तर अजूनही मुंबई पुण्यावरून येणार्यांचा ओघ वाढताच आहे.