प्रतिनिधी/ रत्नागिरी
आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही सांगू नका असे पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत़े मात्र रत्नागिरी पोलीस मुख्यालयात काम करणाऱया पोलिसालाच बँक खात्याची माहिती विचारून 55 हजाराचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात राजवीर सिंग नामक इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
राजाराम मारूती पाटील (40, संमित्रनगर रत्नागिरी) असे या पोलीस कर्मचाऱयाचे नाव आह़े पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 जून रोजी राजाराम पाटील यांच्या मोबाईलवर राजवीर सिंग नामक इसमाने फोन केला होत़ा यावेळी राजवीर याने आपण ऍक्सिस बँक मधून बोलत आहोत़ तुम्हाला क्रेडीट कार्डवर ऑफर आली आहे, अशी बतावणी राजवीर याने केल़ी
यावेळी राजवीर याने पाटील यांच्या माबाईलवर 6 वेळा ओटीपी पाठवल़ा या ओटीपीचा नंबर विचारून राजवीर याने त्यांच्या खात्यामधून सुमारे 55 हजार रूपयांची रक्कम काढून घेतल़ी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने राजाराम पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत़