वार्ताहर / खोची
लोकांची मोठी वर्दळ असणाऱ्या भेंडवडे हद्दीतील विहिरीजवळ मगरीचे पिल्लू दिसून आले.खोची ता.हातकणंगले येथील प्राणीमित्र अमोल सुतार, तेजस जाधव,भेंडवडेचे कपिल पसाले, सचिन निकम या युवकांनी मगरीचे पिलू पकडले.लोकांची रात्रीच्या अंधारात कोणतीही तमा न बाळगता मगरीच्या पिलास जेरबंद केले, आणि येथील परिसर भयमुक्त केला.
चार फूट लांबीचे पकडलेले मगरीचे पिलू वन्यजीव बचाव पथकाचे प्रदीप सुतार यांच्या कडे सुपूर्द केले. या मगरीला डॉ. संतोष वाळवेकर यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून नेसर्गिक अधिवासमध्ये सोडण्यात आले.