प्रतिनिधी / कराड :
शहरात कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर पालिकेने उपाययोजनांना गती दिली आहे. शहरात मास्क न वापरणारे व्यापारी, नागरिक यांच्यावर पालिकेने कारवाई सुरू केली असून गुरूवारी 6 जणांना प्रत्येकी पाचशे रूपये दंड ठोठावण्यात आला.
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सकाळी आरोग्य विभागास सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाच्या मुकादमांनी शहरात फिरून कारवाई केली. व्यापारीच मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले. अशा पाच व्यापाऱयांना प्रत्येकी 500 रूपये दंड करण्यात आला. तर एका नागरिकासही दंड करण्यात आला.
शहरात मास्क न वापरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे यावर शहरात कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी याबाबत निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.