प्रतिनिधी / महाबळेश्वर :
मुन्वर हौसिंग सोसायटी मधील एका घराच्या भिंत्तीवर आदळुन स्कुटीवर असलेले निलेश ढेबे 24 , त्रुषीकेश बावळेकर व महेश गायकवाड हे तीन युवक जखमी झाले तीघां पैकी दोघांची प्रकृती गंभिर असुन सर्वांना पुढील उपचारासाठी सातारा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे तिघे येथील एका केबल नेटवर्क कंपनी मधील कर्मचारी होते
दिवसभर केबल नेटवर्कचे काम करून दुपारी जेवणासाठी हे तीन युवक येथील मुन्वर हौंसिंग सोसायटी मध्ये निघाले होते या सोसायटीकडे जाताना रस्त्याला तीव्र उतार आहे याच उतारावरून त्यांचा स्कुटीवरील ताबा सुटला व तीव्र उतारा वरून वेगाने दुचाकी समोर असलेल्या एका घराच्या भिंत्तीवर जावुन आदळली या अपघातात तिघे गंभिर जखमी झाले सोसायटी मधील रहीवाशांनी तातडीने रूग्णवाहीकेसाठी 108 क्रमांकावर संपर्क साधला तसेच पालिकेला कळविले अपघाताची माहीती मिळताच पालिकेची एक व शिवरक्षक लाईफ लाईन रेस्क्यू टिम ची एक रूग्णवाहीका घटना स्थळी दाखल झाली या दोन रूग्णवाहीकेच्या मदतीने या तिघांना जखमी अवस्थेत येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथुन पुढील उपचारासाठी तिघांनाही सातारा येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले