वार्ताहर / जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात शुक्रवार दि. 3 रोजी आणखी 8 जणांना कोरोना बाधा झाल्याचे आढळून आले असून बाधित संख्या 228 वर पोचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. मुधोळ येथे 1 तर कलादगी येथे 7 रुग्ण आढळले.
रुग्ण क्रमांक 12064 च्या संपर्कामुळे मुधोळच्या शिवाजी सर्कल मधील 27 वर्षाचा युवकाला कोरोनाची बाधा झाली. रुग्ण क्रमांक 8300 च्या संपर्काने कलादगी येथील मिनगार गल्लीचा 38 वर्षाचा पुरुष, 24 वर्षाची महिला, 24 वर्षाचा युवक, 40 वर्षाचा पुरुष, 45 वर्षाची महिला, 13 वर्षाची मुलगी, 32 वर्षाची महिला यांना कोरोना बाधा झाली.
आतापर्यंत जिल्हय़ातील 13738 व्यक्तीचे नमुने प्रयोग शाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 12161 निगेटीव्ह, 236 पॉझीटीव्ह, 5 बळी, 123 कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 98 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हय़ात 25 कंटेन्मेंट झोन आहेत.