तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी १२ कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये ७ पुरुष, 5 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकाचा मृत्यू तर आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 532 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 288 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी रविवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मार्डी तालुका उत्तर सोलापूर, नानज तालुका उत्तर सोलापूर, बेलाटी तालुका उत्तर सोलापूर, नवीन विडी घरकुल तालुका दक्षिण सोलापूर, हत्तुर तालुका दक्षिण सोलापूर, मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर, बोरामणी तालुका दक्षिण सोलापू, जेऊरवाडी तालुका अक्कलकोट, सुखदेव नगर बार्शी, कसबा पेठ बार्शी , बारंगुळे प्लॉट बार्शी, उपळाई रोड बार्शी आदी तालुक्यात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 66 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 54 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 12 पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. 532 रुग्णांपैकी 339 पुरुष 193 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 219 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट 98, मंगळवेढा- 1
बार्शी 99, माढा 11
माळशिरस 6, मोहोळ 26,
उत्तर सोलापूर – 52
करमाळा 4, सांगोला 4,
पंढरपूर25, दक्षिण सोलापूर 206
एकूण 532
होम क्वांरटाईन – 1649
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 4650
प्राप्त अहवाल- 4611
प्रलंबित अहवाल- 39
एकूण निगेटिव्ह – 4080
कोरोनाबाधितांची संख्या- 532
रुग्णालयात दाखल – 288
आतापर्यंत बरे – 219
मृत – 25