प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात रविवारी कोरोनाच्या एकूण संख्येने १३०० चा आकडा पार केला असून संसर्गाची स्थिती चिंताजनक होवू लागली आहे. ग्रामीण भागात अचानक निर्माण होणाऱया संसर्ग साखळय़ा गंभीर असून त्या तोडण्यासाठी प्रशासनासह सर्व नागरिकांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी कराड तालुक्यातील वनवासमाचीचा आदर्श घ्यावा लागेल. वनवासमाचीत तब्बल ३९ रुग्ण आढळून आले होते, तीच वनवासमाची सध्याच्या स्थितीत कोरोनामुक्त आहे. २१ एप्रिल ते १२ मे या कालावधीत तेथील संसर्ग साखळी वाढली होती. मात्र २४ मेच्या दरम्यान मुक्त झालेली वनवासमाची आज मुक्त श्वास घेत आहे.
शुक्रवारी सातारा तालुक्याच्या चोरगेवाडी या छोटय़ा गावात १२ जण बाधित असल्याचे समोर आले तर जिहे गावात २६ बाधित असून येथील संसर्ग साखळी तोडण्याचे आव्हान गावासमोर उभे आहे. तर जावली तालुक्यातील रामवाडीत आतापर्यंत एकूण ३३ बाधित रुग्ण सापडले असून हॉट स्पॉट बनलेल्या रामवाडीतील साखळी तोडणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात निर्माण होत असलेल्या या संसर्ग साखळय़ा गंभीर असून त्यासाठीच आता प्रशासनासह सर्व नागरिकांची जबाबदारी वाढली असून सावधान आकडे झपाटय़ाने वाढू लागले आहेत.
निकट सहवासित बाधितांचा आकडा ४३
काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित ४३, प्रवास करुन आलेले ५, असे एकूण ४८ नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये १ ते ७५ वर्षे वयोगटातील २५ पुरुष व २३ महिलांचा समावेश आहे. तर रविवारी जिल्ह्यातील सात जणांनी कोरणा वर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा शहरात ५, तालुक्यात १६ जण
सातारा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रविवारी शाहूनगर येथील ३८ वर्षीय महिला, राधिका रोड येथील ५० वर्षीय पुरुष, खावली येथील ६० वर्षीय महिला, सदर बझार, कपिला पार्क येथील महिला वय ४० मोळाचा ओढा येथील २५ वर्षीय पुरुष या शहरातील ५ जणांना बाधा झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सातारा तालुक्यात बोरगाव येथील १३ वर्षीय युवती, २५ वर्षीय महिला व १ वर्षाची बालिका, लिंब येथील ३९ वर्षीय महिला. जिहे येथील २० वर्षीय युवक याचा समावेश आहे.
कराडमधील सोमवार पेठेतील मुंबईकर अधिकारी बाधित
कराड तालुक्यात देखील स्थिती चिंताजनक होत असताना आता कराड शहरात देखील बाधित रुग्ण आढळून येवू लागलेले आहेत. सोमवर पेठेतील एक ४६ वर्षीय पुरुष बाधित झाला आहे. तो परळ डेपोत अधिकारी आहे. तो कराडला आल्यानंतर थेट कॉटेजला गेला. त्यानंतर त्याला इंजिनीअरिंग कॉलेजमधील विलगीकरण कक्षात ठेवले होते. तो घरातील कोणाच्याही संपर्कात आलेला नाही. त्यामुळे सोमवार पेठेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर तालुक्यात वाठार येथील १९ वर्षीय युवती, कैलास अर्पाटमेंट सैदापूर येथील ३० वर्षीय पुरुष, बनवडी येथील ४८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्याला बाधा
विद्यानगर येथे राहणारा एक बँक कर्मचारी बाधित झाला असून तो कराडमधील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत सेवेत होता. त्याच्या संपर्कात अन्य कर्मचारी आले आहेत. सातारा पालिकेतल्या लेखापाल महिलेशी त्यांचा विवाह ठरला होतात. ती महिलाही पॉझिटिव्ह आले आहे. त्यांनी लग्न बस्ता एकत्र केला होता. त्यामुळे ते दोघेही बाधित आले आहेत.
माणमध्ये ६, खंडाळय़ात ४, कोरेगाव २
यामध्ये माण तालुक्यातीत खडकी येथील ४४ वर्षीय पुरुष, इंजबाब येथील २८ वर्षीय पुरुष, पळशी येथील ३३ वर्षीय पुरुष, मोगराळे ३४ वर्षीय पुरुष, दानवलेवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, वावरहिरे येथील ३५ वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील २१ वर्षीय पुरुष, २२ व २५ वर्षीय महिला, लोणंद येथील ३१ वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील सुरली येथील ५६ वर्षीय पुरुष, साप येथील ४१ वर्षीय महिला.
पाटण तालुक्यात वाढ सुरुच
पाटण तालुक्यातील बाधितांची संख्या वाढतच चालली असून काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात देखील ७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. बाधित ग्रामीण भागातील व प्रवासाची हिस्ट्री असलेले तरी पुन्हा त्यांच्या सहवासात येवून बाधित होणारांची संख्याही वाढत चालली आहे. तालुक्यात कोयनानगर येथील २५, ३६, ४७ वर्षीय पुरुष व ५०, ४०, २३ वर्षीय महिला, काळकूटवाडी येथील ६० वर्षीय पुरुष यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
जावलीतही स्थिती गंभीर
जावली तालुक्यात जिल्हय़ात पहिल्यांदा निझऱयात कोरोनाची संसर्ग साखळी तयार झाली होती. ती नंतर तुटली देखील मात्र जून व मे महिन्यात जावली तालुक्यात वाढलेली बाधितांची संख्या गंभीर होवू लागलेली आहे. जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी येथील १६ व ४५ वर्षीय महिला, सायगाव येथील ६० वर्षीय महिला यांचा समावेश आहे तर वाई तालुक्यातील अभेपूरी येथील ४५ वर्षीय पुरुष यांचे रिपोर्ट बाधित आहेत.
७ नागरिकांची कोरोनावर मात
जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर मधील उपचार घेवून बरे झालेल्या ७ रुग्णांना दहा दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये पाटण तालुक्यात चाफळ येथील २७ वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यात मायणी येथील २७ वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यात पाटखळ माथा येथील २८ वर्षीय पुरुष व राजापुरी येथील ३९ वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यात सावली येथील २७ वर्षीय पुरुष, शिंदे वस्ती (लोणंद) येथील ३७ वर्षीय महिला. वाई शहरातील एका पुरुषाचा समावेश आहे.
१२६ नागरिकांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय ६३, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील १३, पानमळेवाडी येथील १०, मायणी येथील १४, महाबळेश्वर येथील ९, खावली येथील १७ असे एकूण १२६ नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
निकट सहवासित बाधितही बेशिस्त
जिल्हय़ात बाहेरुन आलेले नागरिक कोरोना बाधित होत असताना आता त्यांच्या निकट सहवासात आलेले नागरिक बाधित होणे ही संसर्ग साखळी निर्माण होण्याचा प्रकार असून ती रोखण्यासाठी सोशल डिस्टनसिंग कटाक्षाने पाळावे लागणार आहेत. शिथीलता मिळाल्यानंतर ज्या पध्दतीने गर्दी होवू लागली, संपर्क वाढला तसा कोरोनाही वाढू लागला असून ही बेशिस्त बंद करुन जिल्हावासियांना गंभीर व्हावे हा संदेश समोर येत असलेली गंभीर परिस्थिती देत आहे. त्यासाठी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावेच लागेल.
जिल्हय़ात रविवारपर्यंत
घेतलेले एकुण नमुने १४८४२
एकूण बाधित १३०४
घरी सोडण्यात आलेले ७८४
मृत्यु ५५
उपचारार्थ रुग्ण ४६५
रविवारी
एकूण बाधित ४८
एकूण मुक्त ०७
बळी ४