नवी दिल्ली
अमेरिकेतील दिग्गज रिटेलर कंपनी वॉलमार्टने ई-कॉमर्स व्यवसायात फ्लिपकार्टमध्ये 1.2 अब्ज डॉलर्सची नवीन गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. या अगोदर वॉलमार्टकडून 2018 मध्ये 24.9 अब्ज डॉलर्सच्या मुल्यावर फ्लिपकार्टचे अधिग्रहण करण्यात आले होते. देशातील प्रतिस्पर्धी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची ई-कॉमर्स वेंचर जिओमार्ट दिग्गज गुंतवणूकादारांच्या मदतीने अब्जावधी डॉलरची गुंतवणूक जमा करत आहे, हे पाहूनच सदरचा निर्णय वॉलमार्टने घेतल्याचे समजते. त्यांना टक्कर देण्यासाठीच हा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. फ्लिपकार्टमध्ये होणाऱया या गुंतवणूकीत कंपनीच्या सध्याच्या गुंतवणूकदारांचा समावेश होणार आहे.
ही गुंतवणूक वित्त वर्ष 2021 च्या दरम्यान दोन टप्प्यात केली जाणार आहे. आमच्या समभागधारकांनी चांगले सहकार्य दिले आहे. त्याबद्दल आम्ही आभारी असल्याचे फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे.