श्रीनगर
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात पुँछ येथे तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच एक नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार सुरू केला. पाकिस्तानने छोटी शस्त्रे आणि मॉर्टर यांच्या मदतीने पुँछमधील गुलपूर येथे मारा सुरू केला. नियंत्रण रेषेजवळच्या या परिसरात पाकिस्तानने केलेल्या माऱयाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले.
दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तान अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने यापूर्वीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन नियंत्रण रेषेजवळच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये गोळीबार केला आहे. कधी नागरीवस्तीला लक्ष्य करुन तर कधी सैन्याच्या चौकी पहाऱयांना लक्ष्य करुन पाकिस्तानने गोळीबार केला आहे.